अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावातील सुप्रीम कॉलनी भागातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. गुरूवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून घरातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान,  मुलीच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र अल्पवयीन मुलगी आढळून आले नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात  तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दीपक जगदाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.