वनविभागाच्या कारवाईत सागवान लाकूड जप्त

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल येथील शहराला लागुन असलेल्या सुतगिरणी परिसरात वनविभागाने केलेल्या कार्यवाहीत हजारो रुपये किमतीचा सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे.

सातपुडा जंगलातुन गैर मार्गाने मोल्यवान वृक्षांची कत्तल करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात वनक्षेत्राच्या सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, दि. १० / १२ /२०२१ रोजी शुक्रवार  रोजी  १८: ०० वाजेच्या सुमारास सहाय्यक वनसंरक्षक यावल  पी.व्ही. हाडपे आणि यावल पुर्व आणि यावल पश्चिम वनक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी वनपाल, वनरक्षक, पोलीस नाईक, वाहनचालक यांचे पथकाने संयुक्तरित्या मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे यावल शहरातील उत्तर क्षेत्रात सुतगिरणीच्या परिसरात फरार आरोपी अरशद शेख यांचे मालकीचे पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना अवैधरित्या रंधा मशिन,लाकूड चिरकाम करण्याचे आणि फर्निचर तयार करण्यासाठी उपयोगात असलेले इतर साहित्यसह सागवान लाकूड १० नग ०.११० घन मीटर मुद्देमाल किमत ६५००० हजार रुपये किंमतीचे भारतीय वन अधिनियम १९२७ च्यानुसार जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी विरुध्द वनगुन्हा दाखल केला असुन, वनपाल डोंगरकठोरा तालुका यावल यांनी गुन्ह्याची नोंद घेतली असुन पुढील सखोल चौकशी करित आहे. या गुन्ह्यातील पुर्वीपासुनच अरशद शेख या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांची पथके तयार करण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.