अल्पदरात कर्जाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; चर्चेला उधाण, तेरी भी चूप मेरी भी चुप!

0

ज्ञानेश्वर राजपूत, लोहारा

लोकशाही न्यूज नेटवर्क

म्हसास येथे नामांकित बँकेचे अल्पदरात किंवा होमलोनचे कर्ज अल्पव्याजरात पास करून देतो, अशा आमिषाखाली अनेकांची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा आहे. यास अनेक रथी-महारथी जाळ्यात फसले असल्याचे बोलले जात आहे. पण ‘शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावे’ या उक्तीप्रमाणे कुणीही पुढे येवून तक्रारदार भूमिका बजावत नसल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अतिशय वाढले आहे.

हा एजंट संबंधित नामांकित बँकेचा अधिकृत एजंट आहे किंवा नाही हे आतातरी तुर्तास सांगता येण्यासारखे नाही. परंतु हा एजंट कळमसरा येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. मात्र गरजवंत या एजंटशी संपर्क करून उबगलेले आहेत, ज्यांची फसवणूक झाली ज्यांच्या लक्षात येत आहे त्यांना तो प्रतिसादही देत नसल्याने या प्रकरणाला वाचा फुटण्याची चिन्हे होत असलेल्या चर्चेअंती कळत आहेत.

हा प्रकार काही वर्षांपासून सुरू असल्याने कर्ज प्राप्त करण्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतात. कागदपत्रांसाठी खर्च करावा लागतो असे बोलून अनेकांजवळून हजारो रुपये खर्चापोटी या एजंटने पैसे उकळलेले असूनही जाहीरपणे कुणीही बोलत नसल्याने फसवणूक तर झालीच पण; तेरी भी चूप मेरी भी चुप! अशा गप्पा येथे सुरू असताना परंतु हा एजंट कोण? हे प्रकरण काय? खरंच फसवणूक झाली असेल तर हे समोर येणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.