अमित डुडवे ‘Innovative Teacher of The year 2019’ पुरस्काराने सन्मानित

0

चोपडा | प्रतिनिधी 

इंटरनॅशनल स्कुल अवॉर्ड असोसिएशन आणि चितकारा युनिव्हर्सिटी चंदिगढ यांच्या संयुक्त विद्यमाने चंदिगढ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड, ता. चोपडा येथील उपक्रमशील शिक्षक  अमित डुडवे यांना Innovative Teacher of the Year 2019* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कारासाठी ५१ देशातील ९६७६ नामांकने आली होती. या नामांकनातून  अमित डुडवे यांची *”स्टोरीविव्हर वेबसाईटवरील आदिवासी पावरी बोलीभाषेतील कथासंग्रहांचे प्रकाशन व पावरी भाषेतील शब्दकोशाची निर्मिती”* यासाठी Innovative Teacher of the Year या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. श्री. डुडवे यांना सदर पुरस्कार *डॉ. अताहउल्ला वाहदियार (माजी शिक्षणमंत्री अफगाणिस्तान, व अफगाणिस्तान चे शिक्षण सल्लागार) तसेच डॉ. दीपक वोहरा (माजी भारतीय राजदूत आफ्रिका) व डॉ. नियती चितकारा (कुलगुरू चंदिगढ युनिव्हर्सिटी)* यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. *जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सदर पुरस्कार मिळवणारे श्री. अमित डुडवे हे पहिलेच शिक्षक ठरले आहेत.* हा पुरस्कार मिळवल्याने दुबई येथे नोव्हेंबर 2019 मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स साठी त्यांची निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये सीसीआरटी हैदराबाद येथे आयोजित Role of School in Conservation of Cultural & Natural Heritage यावर आधारित कार्यशाळेत डुडवे यांच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला होता. श्री. डुडवे यांच्या यशामुळे डॉ. भावना भोसले, गशिअ चोपडा व श्रीमती वंदना बाविस्कर, केंद्रप्रमुख नागलवाडी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.