अपंग बांधवांना नवीन अंत्योदय शिधापत्रीका वाटप

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल येथील तहसील कार्यालयात आज जागतिक  अपंग दिना निमित्ताने तालुक्यातील अपंग कुटुंब प्रमुखांना पुरवठा विभागाच्या माध्यमातुन अंत्योदय शिधापत्रीकांचे वाटप तहसीलदार महेश पवार यांच्था हस्ते वाटप करण्यात आले.

यावल येथे आयोजित तहसीलदार यांच्या कार्यालयात आज दुपारी जागतिक अपंग दिना निमित्त तालुक्यातील गोपाळ भास्कर खाचणे, सुभाष आंनदा सोनवणे, पंडीत वामन पाटील, शंकर गणपत खाचणे, जिजाबाई कडू सोनवणे, मिनाबाई नथ्थु बऱ्हाटे, जितेन्द्र मुकंदा कपले, मनिषा गोपाळ खाचणे, पोपट हरी चौधरी, सोमेश संजय सोनवणे, दत्तात्रय भास्कर चौधरी, सतिष वसंत सोनवणे, गणेश सीताराम भारंबे, कल्पना प्रमोद चौधरी, सुहासनी गंगाधर चौधरी, हसन महारू तडवी, फारूकी जल्लालुदीन नसीरोद्दीन, संजय पंढरीनाथ वानखेडे, प्रभाकर सुखदेव सोनार, ललीत प्रभाकर वाघुळदे अशा एकुण ३२ अपंग बांधव व भगीनींना शासनाच्या अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य मिळावे या करीता यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या प्रयत्नातुन शिधापत्रीका वाटप करण्यात आली असुन या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांस ३५ किलो धान्य मिळणार आहे.

याप्रसंगी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांच्यासह आदी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.