ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीने महिलेने उपोषण सोडले

0

लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथे नवीन शॉपिंग संकुलात आपल्या हक्काच्या ठिकाणी गाळा मिळावा यासाठी सुनंदाबाई छोटूलाल बिऱ्हाडे या महिलेचे ग्रामपंचायत आवारात आमरण उपोषण सुरू होते. अखेर गाळ्यांच्या तडजोडीसह त्यांची समजूत करून उपोषण मिटविण्यात ग्रामपंचायत प्रशासनास यश आले.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी रात्री ग्रामपंचायत सदस्य तसेच श्रेष्ठीनी सुनंदाबाई बिऱ्हाडे यांच्या नातेवाईकांसोबत तसेच समाजातील ज्येष्ठांसोबत मध्यस्थी करत त्यांना सुलभ प्रशस्त पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. सुनंदाबाई बिऱ्हाडे यांना दिलेला गाळा मंजूर असल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष ए.के. गंभीर सर, उपाध्यक्ष उपेंद्र पाटील, माजी उपसरपंच कैलास बाविस्कर तसेच ग्रा.पं सदस्य यांनी उपोषणकर्त्या सुनंदाबाई बिऱ्हाडे यांना जलपान करून उपोषण सोडले. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ मंडळी, पत्रकार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.