अनुकंपाधारकांच्या पदरी निराशा

0

प्रतीक्षा यादी वाढली : शासनाने केली टक्केवारी निश्‍चित

जळगाव :
जिल्हा परिषदेस अनुकंपाचा प्रतीक्षा यादी 300च्या वर पोहचली आहे, दररोज अनुकंपा विदयार्थी भरतीसाठी जिळ परिषद येत असतात त्यांच्या पदरी निराशा येत आहे. शासनाचे स्पष्ट आदेश असताना प्रशासनाकडून आदेशाचा म किस म पडला जात आहे त्यामुळे तब्बल 29 विध्यार्थाना नोकरी पासून वंचित रहावे लागत असल्याची माहिती समोर आली , शासनाने रिक्त पदांच्या भरती मध्ये राखीव पदाची टक्केवारी निश्‍चित केली आहे त्यानुसार सन 2019 पर्यंतच्या काळात होणार्‍या भरतीमध्ये अनुकंपाधारकातून 20% पदे भरण्यासाठी आदेश 15 फेब्रुवारी 2018 रोजी देण्यात आला हे सर्व ठीक असून सुद्धा जळ्गाव जिल्हा परिषद अनुकंपा भरतीसाठी शासनाचे मार्गदर्शन मागवावे लागेल असे आश्‍वासन सि.ई.ओ कडून देण्यात आले आहे
कागदी खेळामुळे वेटिंग वाढली
2015 पासून अनुकंपाची भरती झाली नसल्याने जिल्हा परिषदेच्या अनुकंपाधारकांची वेटिंग लिस्ट 300 वर पोहचली आहे त्यातच प्रशासनाकडून कागदी खेळ सुरु झाल्याने व सि.ई.ओ शिवाजी दिवेकर यांच्या भूमिकेमुळे 29 विध्यार्थाना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे
सि.ई.ओ कडून चालढकल – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेगावकर हे हेतुपुस्कार दुर्लक्ष करीत असून अनुकंपाधारकांची चेष्टा करीत आहे शासनाने निर्देश दिल्यानंतर ही उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त होत आहे ,वाढती महागाई, बेरोजगारी ,यामुळे अनुकंपाधारकांना उपासमारीची वेळ येऊन ठेवली असून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
अभ्यास  करण्याचा सल्ला –
सि.ई.ओ शिवाजी दिवेगावकर यांना नाशिक विभागीय आयुक्त यांनी परिपत्रकाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे परिपत्रकात नमूद बाबी कडे अनुकंपाधारकांना सवलत द्यावी असे स्पष्ट केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.