केकतनिंभोरा ग्रा.पं.चा अजब फंडा

0

जामनेर ( प्रतिनिधी ) –
तालुक्यातील केकतनिंभोरे येथे एकाच कामाचे वेगवेगळया महिन्यात दोन वेळा उदघाटन झाल्यामूळे ग्रामस्थांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला असून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते केकतनिंभोरे येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत 33/11 के.व्ही.वीज उपकेंद्राचे उदघाटन दि.20 जानेवारी 2018 रोजी सरपंच सविता भोंडे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थित मोठया ताटामाटात पार पडले. त्यानंतर आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे सरपंच सविता भोंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असून दि.3 मार्च 2018 रोजी हर्षदा दिपक पाटील यांनी सरपंचपदाची धुरा सांभाळत आहेत. ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनाला एक प्रकारे आव्हान देत सदर उपकेंद्र आपल्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचा खोटा देखावा करीत विद्यमान सरपंचपतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत दि.14 एप्रिल रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा याच उपकेंद्राचे सरपंच हर्षदा पाटील यांच्या हस्ते व उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांच्या उपस्थित घाईघाईने उदघाटन करून घेतले. या कार्यक्रमाचे फोटो खुद उपसरपंचानी सोशल मिडीयाच्या माध्यमातून गावातील व्हाटसअप गृपवर व्हायरल करून उदघाटन झाल्याचे घोषित केल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून एकाच कामाचे दोन वेळा उदघाटन झाल्यामुळे नेमके खरे उदघाटन मंत्र्याच्या का सरपंचाच्या हस्ते हा प्रश्‍न गावकर्‍यांच्या मनात येत असून गावात चर्चेचा विषय बनला आहे. विद्यमान सरपंच या फक्त नामदारी असून गावाचे खरे कारभारी त्यांचे पती देव आहे असे ही गावातील नागरीकांकडून बोलले जात आहे. ना.महाजन यांच्या हस्ते उदघाटन होऊन जवळपास तीन महिने उलटले असून प्रत्यक्षात कामाला मात्र सुरूवात सरपंचानी उदघाटन केल्यावरच सुरू झाले आहे. या उदघाटनाबदल वीज वितरण कंपनीचे अधिकारी व ग्रामसेवक यांना विचारणा केली असता याबाबत आम्हाला काही एक माहित नसल्याचे सांगितले तर प्रत्यक्षात कामाला आज सुरूवात झाली म्हणून फक्त नारळ फोडले असे सरपंच हर्षदा पाटील यांनी सांगितले. सदर उपकेंद्र उभारणीचे काम हे वीज वितरण कंपनीच्या अधिपत्याखाली येत असून ग्रा.पं.तीचा या भुमिपूजनाशी काहीएक संबंध नसून फक्त प्रसिध्दीचा स्टंट करून गावातील नागरीकांची दिशाभूल करण्याचा हेतू यातून दिसून येत आहे. सर्वांना सोबत घेऊनच गावाचा विकास साध्य करता येतो असे मत मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा येथील रहिवाशी अशोक पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.