षडयंत्र रचल्याप्रकरणी अंजली दमानिया विरूध्द गुन्हा

0

जळगाव
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक वेळा भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द बेछुट आरोप करून त्यांची व त्यांच्या कुटूंबियांची बदनामी केल्या प्रकरणी दि. 19 एप्रिल 2018 रोजी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आज आ. एकनाथराव खडसे यांच्या तक्रारीनुसार अंजली दमानिया, अनिष दमानिया यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली दमानिया यांनी आ.खडसे व त्यांच्या कुटूंबिया विरूध्द अनेक प्रकारचे आरोप वेळोवेळी केले. परंतु कुठल्याही आरोपात आता पर्यंत कोणताही पुरावा अथवा तथ्य आढळून आले नाही. आ.खडसे विरोधी पक्षनेता असल्यापासून सदर जमिनीबाबत 2012 पासून पाठपुरावा करत होते. त्यानंतर सदर अजंली दमानिया यांनी गैरमार्गाने व खोटी कागदपत्रे पुरावे गोळा करून जमीन विकत घेतली होती. सदर जमिनी विषयी स्वत. सरकार उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेलेल्या असून सदर याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
सदर बेकायदा जमीन आ.खडसे यांनी सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकार जमा झाल्याचे वाईट वाटल्यामुळे अंजली दमानिया यांनी असा दावा केला होता की, मुक्ताई साखर कारखान्याचे मालक शिवाजी जाधव यांच्या श्रध्दा कंस्ट्रक्शन या संस्थेची अनेक कामे घेतले. त्यामध्ये खडसेेंना पैसा पुरविण्यात आला.
आ.खडसे यांचे जावाई यांनी बेकायदेशीररित्या लिमोझीन कारजवळ बाळगली व पोलीस राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाई करत नाही. गजानन पाटील यांनी 30 कोटी रूपयांची खंडणी मागितली. त्यामध्येही खडसेंचा सहभाग होता तसेच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. अशा प्रकारे वेगवेगळया खोटया निराधार सुड बुध्दीने प्रेरित होवून बेछूट व बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे आ.खडसे यांची व त्यांच्या कुटूंबियांची बदनामी झाल्याने दमानिया यांच्या विरूध्द बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलतांना आ.खडसे म्हणाले की, दमानीया यांनी आज पर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपांची वरीष्ठ पातळीवरून चौकशी होवून त्यात कुठलेही तथ्य आढळले नाही या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून दमानीया यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वरीष्ठ पातळीवरून चौकशीचे आदेश दिले आहे अशी माहिती श्री.खडसे यांनी दिली. अंगारीका कंपनीच्या संदर्भात ते म्हणाले की, मंदाकिनी खडसे ह्या माझ्या पत्नी असून त्यांच्या नावे पैसे टाकणे व काढणे हा माझा अधिकार आहे. या प्रकरणात देखील तथ्य नसून दमानिया यांच्यावर अजुन गुन्हे दाखल होतील असे श्री. खडसे म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. रोहीणीताई खडसे खेवलकर, अशोक लाडवंजारी, बोदवड कृ.ऊ.बा समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.