लग्न मुहुर्ताच्या पर्वसंध्येला वधु पित्याचा मृत्यु

0

वरणगाव शहरातील झाबरे वाड्यातील रहिवाशी किशोर सुकदेव झाबरे ( 51 ) याच्या मुलीचे लग्न आसोदा येथील युवकाशी 20 एप्रिल रोजी नियोजीत केले होते लग्न शुक्रवारी असल्या कारणाने सर्व नातेवाईक मंडळी आनंदात असताना वधु पित्याला हृदयविकारा तिव्र झटका आल्याने त्याना संध्याकाळी सहा वाजेला उपचारा साठी जळगाव येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला
आनंदावर विरजन
ऐन लग्न मुहुर्त जवळच असताना वधु पिताचा मृत्यू झाल्याने आनंदावर विरजन पडले परिवारावर शोककाळ पसरला त्याच्या पश्‍चात पत्नी एक मूलगा एक मूलगी असा परिवार आहे
त्याच्यावर रात्री उशिरा अत्यसंस्कार करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.