‘अनलॉक ३’ चे नवे नियम केंद्राने केले जाहीर: जाणून घ्या

0

नवी दिल्ली । देशभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आला आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, यावेळी केंद्र सरकारने अनलॉक ३.० ची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये रात्री फिरण्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. सोबतच योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टपासून अनलॉक ३ च्या टप्प्याला सुरुवात होत असून यावेळी कंटेनमेंट झोनबाहेर असणारे निर्बंध अजून शिथील करत अनके गोष्टी सुरु कऱण्यास परवानगी देण्यात येत आहे. केंद्रशासित प्रदेश, राज्यं सरकार तसंच इतर महत्त्वाच्या विभागांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे.

नवीन मार्गदर्शक नियमावलीनुसार, नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. यामुळं रात्री फिरण्यावरील बंदी हटली आहे. याशिवाय योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. अनलॉक ३ मध्येही चित्रपटगृह, मेट्रो, स्विमिंग पूल बंद राहणार आहेत. तर कंटेन्मेंट झोन्समध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता तिथे कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाहीए.


मात्र, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्वाजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असेल. गर्दी होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असेल. लग्न समारंभासाठी ५० हून अधिक पाहुण्यांना परवानगी नाही. अंत्यविधीलाही २० पेक्षा अधिक नागरिकांना परवानगी नाही. तसंच सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा आणि तंबाखू आणि दारू पिण्यास बंदी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.