भुसावळातील दगडफेक प्रकरणी संशयीत आरोपीला अटक

0

भुसावळ (प्रतिनिधी)– बंद दरम्यान भुसावळात पोलिसांवर दगडफेक झाली होती. या प्रकरणी आजपर्यंत अटकेतील आरोपींची संख्या झाली १५ झाली आहे.

याचप्रकरणी पोलिसांनी आरोपी शकील उर्फ मोहंमद जलील (रा. शिवाजी नगर, भुसावळ) यास अटक केली आहे. जानेवारी महिन्यात भुसावळ बंदच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवर हिंसक जमावाने दगडफेक केल्यानंतर गुन्हा दाखल होवून १५ संशयीतांना अटक करण्यात आली होती तर या गुन्ह्यात १८५ जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या गुन्ह्यात संशयीत शकील उर्फ मोहंमद जलील (रा. शिवाजी नगर, भुसावळ) हा जाम मोहल्ला परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आरोपीस मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.