अधिवेशनात गोंधळ; राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यावेळी ही मोठी कारवाई करण्यात आली. निलंबन झालेल्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, आणि तृणमूलच्या काही खासदारांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता. 12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाल्याचंही पहायला मिळालं. त्यानंतर खासदारांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.

निलंबितांमध्ये काँग्रेस, शिवसेना, तृणमूलच्या खासदारांचा समावेश आहे. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदारांवरील कारवाईनंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यात काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 2, तृणमूलचे 2 खासदार निलंबित करण्यात आले.

प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना

अनिल देसाई, शिवसेना

फुलो देवी नेताम, काँग्रेस

छाया वर्मा, काँग्रेस

रिपुन बोरा, काँग्रेस

राजामणि पटेल, काँगेस

सैय्यद नासिर हुसेन, काँग्रेस

अखिलेश प्रसाद सिंह, काँग्रेस

एलामरम करिम, सीपीएम

डोला सेन, तृणमूल काँग्रेस

शांता छत्री, तृणमूल काँग्रेस

बिनय विश्वम, सीपीआई

 

Leave A Reply

Your email address will not be published.