अखेर पहिली कोरोना लस रशियामध्ये लॉंच ; पुतिन यांनी दिला मुलीला लशीचा डोस

0

मॉस्को : जगभरात करोनाचा कहर सुरु असताना रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे. रशियाच्या कोरोना लशीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितले.

रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे.

रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.