साने नगर भागात सिद्धेश्वर मंदिराच्या घाटाची पाहणी, मंदिरातील घाटाचे काँक्रीटीकरण करणार- आ. अनिल पाटील

0

अमळनेर (प्रतिनिधी):-शहरातील तांबेपुरा भागात असलेल्या सानेनगर भागात सोमवारी सदिच्छा भेट दिली त्यात सानेनगर भागाच्या समस्या जाणून घेत लवकरच सिद्धेश्वर मंदिर घाटाचे काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन यावेळी नागरिकांना दिले.

यावेळी कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक घेऊन चर्चा केली, शहरातील बोरी नदीतून पलीकडे शेतकरी बांधवाना शेतात जाण्यासाठी बोरी नदी पार करावी लागते बोरी नदीला पूर आल्यानंतर शेतकरी बांधवाना पलीकडे जाण्यासाठी जागा नसते व शेतात जाण्यास निर्माण होणाऱ्या समस्या विषयी माहिती घेतली. यावर लवकरच काहीतरी मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले. तसेच या भागात तरुणांना व्यायामासाठी व्यायामशाळाला साहित्य उपलब्ध करण्यात येईल. तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात येणार असून स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करण्यात येतील आदी समस्या ऐकून त्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक संतोष पाटील, महेश पाटील, रावसाहेब पेहेलवान, सुभाष पवार, प्रकाश जिजाबराव पाटील, भिका नाना पाटील, सदाशिव पाटील, दिपक पवार, संजय पाटील, वसंत पाटील, प्रविण पाटील, गणेश पाटील, गुलाब पाटील, जगदीश पाटील, दादा पाटील गोविंदा बाविस्कर व सानेनगर व परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.