सब घोडे बारा टक्के

0
  • राजकीय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वाचलीच पाहिजे
  • क्षणभंगुरतेचा शाप
  • १९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी लिहलेली कविता
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गिविंद करंदीकर…. विंदां

प्रासंगिक कवितेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. प्रसंग झाला की संदर्भ बदलतात आणि कविता मागे पडते.
१९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी ही कविता लिहिली.

आज व्यंगचित्र सुचले नाही परंतु ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गिविंद करंदीकर यांची ही कविताच आठवली….
ही कविता आजच्याही परिस्थितीवर तंतोतंत लागू पडते… – प्रा. डॉ. आशिष विखार (कार्टुनिस्ट)

अगदी शेवटपर्यंत ते तिला “काही केल्या मरत नाही म्हणुन ही दुर्दैवी कविता आहे” असे म्हणत असत. ज्या दिवशी मरेल (लाक्षणिक अर्थाने) तो दिवस भारताचा सुदीन.

सब घोडे बारा टक्के

जितकी डोकी तितकी मते; जितकी शिते तितकी भुते|
कोणी मवाळ, कोणी जहाल; कोणी सफेद, कोणी लाल|
कोणी लट्ठ, कोणी मट्ठ; कोणी ढिले कोणी घट्ट|
कोणी कच्चे, कोणी पक्के; सब घोडे बारा टक्के ||

गोड गोड जुन्या थापा; तुम्ही पेरा तुम्ही कापा |
जुन्या आशा नवा चंग| जुनी स्वप्ने, नवा भंग|
तुम्ही तरी करणार काय; आम्ही तरी करणार काय|
त्याच त्याच खड्डया मध्ये; तोच तोच पुन्हा पाय|
जुना माल नवे शिक्के; सब घोडे बारा टक्के ||

जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी
जिकडे टक्के तिकडे टोळी|
ज्याचा पैसा त्याची सत्ता; पुन्हा पुन्हा हाच कित्ता|
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार; मंद घोडा अंध स्वार|
यांच्या लाथा त्यांचे बुक्के; सब घोडे बारा टक्के ||

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्याची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी“देईन” म्हणा; मीच फसविन माझ्या मना
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के ||

Leave A Reply

Your email address will not be published.