राज्यात अघोषित आणीबाणी, तर मग देशात घोषित आहे का? उद्धव ठाकरे फडणवीसांमध्ये खडाजंगी

0

मुंबई । राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.

 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर भाजप नेत्यांनी बहिष्कार टाकला. राजकीय मेळावे, कार्यक्रम सुरू झाले असताना अधिवेशनाला विरोध, ही भूमिका अनाकलनीय आहे. मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात वेळ वाया जाण्याची शक्यता फडणवीस यांनी बोलून दाखविली. ओबीसींच्या प्रश्नावरूनही ठाकरे आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.