मोटार सायकल चोरी प्रकरणी तिघांना एलसीबीने केले अटक

0

जळगाव  

हल्ली  राज्यभरात  मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले जात असून या तपासावर लक्ष दिले जात आहे. याच पाश्र्वभूमीवर  जळगाव एलसीबी पथकाने आज मोटार सायकल चोरी प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपास कामात प्राप्त माहितीनुसार चेतन योगेश पाटील (शनी मंदीर चौक पारोळा) यास एलसीबी पथकाने चौकशीकामी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याच्याकडून सागर रविंद्र पाटील (शनीमंदीर पारोळा) व व विक्रम अरुण गायकवाड (पारोळा) या दोघांची नावे पुढे आली.

दुचाकी चोरी करण्याचे काम चेतन पाटील व सागर पाटील यांनी केले. तसेच विक्रम गायकवाड याने चोरीच्या मोटार सायकल विकत घेण्याचे काम केल्यामुळे त्याला देखील आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. प्रदीप पाटील, जयंत पाटील, दादाभाऊ पाटील, पो.ना. नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, विनायक पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी, अशोक पाटील, आदींनी तपासकामात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.