मध्य प्रदेशात पुन्हा शिव’राज’

0

भोपाळ – काँग्रेसचे जेष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यापासून मध्य प्रदेशात रंगलेल्या राजकीय नाट्याचा पडदा आज शिवराज सिंह चौहान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीने पडला. राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना १५ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ आज पुन्हा एकदा चौहान यांच्या गळ्यात पडली.

देशभरामध्ये सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज भोपाळ येथील राजभवनामध्ये शिवराज सिंह चौहान यांनी कसलाही गाजावाजा न करता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.