भरधाव कारने महिलेला फुटबॉलसारखे उडविले

0

राष्ट्रीय महामार्गावरील जान्हवी हॉटेलजवळील घटना

जळगाव दि. 4-
भरधाव कारने महिलेला अक्षरश: फुटबॉलसारखे उडविल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहा वरील हॉटेल जान्हवी जवळील कमल पॅराडाईसजवळ सोमवारी संध्याकाळी 6 वाजेदरम्यान घडली.
अपघातात जखमी लिलाबाई शिवाजी हिरे (55) रा. द्वारकानगर, जुनी निमखेडी या रस्ता ओलांडतांना भरधाव येणार्‍या स्विफ्ट कार नं. एम. एच. 12 डी. वाय 0656 वरील लियास नामक बेधुंद चालकाने कार त्यांना उडविले. धडक एवढी जोरात होती, की लिलाबाई ह्या अक्षरश: उडाल्या. या घटनेत लिलाबाई यांना जबर मुका मार बसलेला आहे. तर पायाचे हाड मोडले आहे.
कारची ट्रायल घेताना घडला अपघात
अपघाताला कारणीभूत असलेली कार ही पंकज अ‍ॅटोची आहे. सदर अपघात घडला त्यावेळी कारची ट्रायल घेणे चालू असल्याचे समजते. लिलाबाई यांनी कारचालकाला थांबण्यासाठी हात देवूनही भरघाव गाडी नियंत्रणात न आणता चालकाने बेजबाबदार पणे महिलेला उडविले. दरम्यान अपघात जबर जखमी लिलाबाई हिरे यांना वैद्यकीय महाविद्यालयातील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ खाजगी दवाखान्यात हलविण्याचे काम चालू होते. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून कार जप्त केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.