तूर, सोयाबीनचे शासनाच्या हमीभावापेक्षा भाव कमी

0

जिल्हयात 9 ठिकाणी तूर खरेदी केेंद्रे, एकरी केवळ 4 क्विंटल 70 किलो मर्यादे खरेदी होणार

जळगांव. दि. 4-
सद्यस्थितीत खुल्या बाजारात कापूस, तूर, व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्तता करीत शासनाने जिल्हयात 9 ठिकाणी तूर खरेदी सुरू केली आहेत. तुर उत्पादक शेतकर्‍यांना 9 ते 10 पर्यत ऑनलाईन नोंदणी करता येईल. पण या केंद्रावर एकरी केवळ 4 क्विंटल 70 किलो एवढी तूरीचे उत्पादन 7 मे पर्यत मुदतीत शेतकर्‍यांकडून स्वीकारली जाणार आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून शेतात पिकलेली सर्वच तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
कापूस हे पीक खर्चाला व मानवी श्रमाला न परवडणारे पीक असून आधी कापसाच्या पिकात मिश्रपीक म्हणून तुरीचे पीक घेणारा शेतकरी आता संपूर्ण शेतात तुरीचे एकमेव पीक घ्यायला लागला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांना एकरी पाच-सहा क्विंटलच्या आसपास तुरीचे उत्पादन होते. जर शेतात कापसामध्ये मिश्र पीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले तरी साधारण चार एकर शेतात कमीत कमी चार ते पाच क्विंटल तर उत्पादन येते. शेतात तुरीचे एकमेव पीक असेल तर तलाठी धुरा व काही जागा कमी करून शेतातील तुरीचा पेरा सात बारावर नोंदवून घेतला जातो. परंतु कापसामध्ये मिश्रपीक म्हणून तुरी असली तर तलाठी केवळ 20 ते 25 टक्के तुरीचे पीक पेरणी केली असल्याची नोंद करतो.
अशावेळी शासन धोरणानुसार एकमेव तुरीचेच पीक असेल तर त्या शेतकर्‍यांच्या शासकीय केंद्रावर 10 क्विंटल 40 किलो एवढ्याच वजानाचे तुरीचे उत्पादन स्वीकारले जाते. तर चार एकरात कापसासोबत मिश्र पीक म्हणून तुर उ
त्पादन घेतले असेल तर अशा शेतकर्‍यांच्या केवळ 2 क्विंटल 60 किलो एवढेच तुरीचे उत्पादन शासन स्वीकारते. यामुळे काही तुर शासकीय खरेदी केंद्रावर नेल्यावरही उरलेल्या तुरीच उत्पादन शेतकर्‍यांनी कोठे द्यावे, हा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीमुळे व्यापार्‍यांचे फावत असून व्यापारी शेतकर्‍यांना हमीभावापेक्षा 600 ते 700 रुपयाचे क्विंटलमागे नाडत आहे. अधिक चौकशी केली असता शासकीय खरेदी केंद्रावरील अधिकारी यंदा दुष्काळ आहे, तर शेतकर्‍यांजवळ एवढ्या तुरीचे उत्पादन आणूल कोठून असे प्रश्न उपस्थित केले जातात. केंद्रावर येणार्‍या तुरी ह्या सिंचनाची सोय असणार्‍या शेतकर्‍यांच्याच आहे. ओलिताची सोय असणार्‍या शेतकर्‍यांना एकरी पाच ते सात क्विंटल व कापसात मिश्र पीक घेणार्‍यांना चार एकरात 10 क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन झाले, ही वस्तुस्थिती आहे. शासनाने मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखिल एकरी पाच क्विंटल या प्रमाणात तुरी खरेदी कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.