नवीन वर्षाचे जम्मू-काश्‍मीरींना सरकारकडून गिफ्ट

0

एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर मंगळवारी रात्री सरकारी रूग्णालयांमध्ये ब्रॉडबॅंड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला हे पाऊल उचलण्यात आले आहे. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर 5 महिन्यांच्या कालावधीनंतर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारचे प्रवक्ते व योजना विभागाचे प्रमुख सचिव रोहित कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाईलवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ बंदीच्या काही दिवसांनंतर यामध्ये थोडी सवलत देत ही सेवा हळूहळू सुरू करण्यात आली होती. सुरूवातील लॅंडलाइन आणि त्यानंतर पोस्टपेड मोबाईल सेवेला सुरूवात करण्यात आली होती. सर्व सरकारी रूग्णालयांमध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाईलवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी दिली. नववर्षाच्या सुरूवातीसह हे पाऊल उचलण्यात आले आहे. काश्‍मीरमध्ये अद्यापही इंटरनेट आणि प्रीपेड मोबाईल सेवा सुरू होणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here