जम्मू-काश्मीर: चकमकीत २ जवान शहीद

0

नौशेरा – जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन भारतीय जवान शाहिद झाले आहे. आज सकाळी नौशेरा सेक्‍टरमध्ये जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात आहे. हे करत असतानाच दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. चकमकीनंतर देखील परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.