…तर आपला मंत्रीमंडळात समावेश : खडसे

0

जळगाव : केवळ दोन महिन्यासाठी मंत्रीपद घेण्यास आपण इच्छुक नव्हतो, आताही नाही. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार व पुन्हा भाजप सरकार आल्यानंतर आपला मंत्रीमंडळात समावेश करण्याबाबत विचार होईल , असा आशावाद माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनीव्यक्त केला. नुकतीच बोदवड येथे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते.

ते म्हणाले, ” राज्याच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात आपला सामावेशाचा प्रश्‍नच नाही. कारण केवळ तीन महिन्यासाठी हे मंत्रीपद आहे. त्यातही पुढील दीड महिने निवडणूकीच्या आचारसंहितेत जाणार आहे. केवळ दोन महिन्यासाठी आपण मंत्रीपद घेण्यास इच्छुक नव्हतो आणि आजही नाही. मात्र पुढील काळात राज्यात पुन्हा भाजप सरकार यावे यासाठी आपला प्रयत्न राहिल. निश्‍चितच पुन्हा आमचे सरकार येईल. त्यावेळी मंत्रीमंडळात सामावेश करण्याबाबत आपला विचार निश्‍चित होईल.पक्षाने आपला मंत्रीमंडळात समावेश नाही केला, तरी आपण गेल्या 40 वर्षाप्रमाणे पुढे पक्षाच्या विस्ताराचे कार्य चालूच ठेवणार आहोत, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.