जळगावला पुनश्य येण्याची इच्छा जागृत झाली आहे- डांगे

0

जळगाव नागरिक कृती समिती तर्फे झालेल्या कृतज्ञता सोहळा

जळगाव,-
महानगरपालिकेचे आयुक्त असलेले चंद्रकांत डांगे यांची बदली झाली असून त्यांनी काल मनपाचा चार्ज सोडला असून त्यांचा आज जळगाव नागरी कृती समिती तर्फे जिल्हा पत्रकार संघातील भवरलाल हिरालाल जैन सभागृहात कृतज्ञता सोहळा पार पडला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत डांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जळगावकर नागरिक, येथील राजकीय व्यक्तिमत्व व सहकारी हे अत्यंत सहकार्य करणारे असल्याने जर शासनाने माझी नियुक्ती जळगाव जिल्हाधिकारीपदी केल्यास मी शासनास विनंती करेन की अतिरिक्त कार्यभार मनपा आयुक्त पदाचा सुद्धा द्या जेणेकरून एकाच वेळी शहर व जिल्हावासीयांची सेवा करता येईल या वेळी व्यासपीठावर सौ प्रतिभा डांगे, श्रीमती प्रतिभा शिंदे, माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार, व ओजस्विनी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे उपस्थित होते. सर्वप्रथम समितीच्या वतीने फारुक शेख यांनी त्यांच्या नऊ महीने अठरा दिवसाच्या कार्याचा आढावा सादर केला रेडक्रॉसचे गनी मेमन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अनिल तायडे, अंनिसचे शहराध्यक्ष अश्फाक पिंजारी, ओजस्विनी चे अविनाशजी काटे ,माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, विनोद देशमुख, माजी उपमहापौर करीम सालार व प्रतिभा शिंदे यांनी चंद्रकांत डांगे यांच्या या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर समितीतर्फे चंद्रकांत डांगे यांचा स्मृतिचिन्ह शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर सौ प्रतिभा डांगे यांचा सुद्धा साडी, चोळी ,शाल देऊन सत्कार करण्यात आला.
अत्यंत भावनिक अशा शब्दात चंद्रकांत डांगे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना जळगाव कर नागरिकांच्या ऋणात राहण्याची इच्छा प्रदर्शित केली.
या संस्थांनी केला सत्कार
नवी पेठ महिला मंडळ, जळगाव जिल्हा मानियार, ओजस्विनी फाइन आर्ट्स कॉलेज, डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे कॉलेज, कमल प्रतिष्ठान, मौलाना आझाद विचार मंच,ईकरा एज्युकेशन सोसायटी,अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव,अक्सा एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी,अकसा बॉईज फाउंडेशन, विधी फाउंडेशन, किशोर पांडे, सुशील वालेचा, वैशाली विसपुते,पुनम खैरनार, आदींनी सुद्धा त्यांचा सत्कार केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारुक शेख यांनी केले तर आभार सरिता माळी यांनी मानले कार्यक्रमास मुविकोराज कोल्हे, शुभम पाटील, शिवम पाटील, पृथ्वीराज सोनवणे, विनोद देशमुख, पियुष बडगुजर, शोएब शेख, दिगंबर शिरसाळे, प्रज्ञा डुगंर, लीना पाठक ,अंकित चव्हाण, कोमल काळे, सुनील सोनवणे, अमोल राठोड, भारती मस्के, वैशाली विसपुते, शोभा हंडोरे, विद्या सोनार, विजया पांडे, राजी नायर, शोभा चौधरी ,सपना शर्मा, मनीषा पाटील ,नीलू इंगळे, भावकी चौधरी, वैशाली जोशी, अल्ताफ शेख, रउफ रहीम ,महमूद टेलर आदींची उपस्थिती होती.

फोटो- नागरी कृती समिती तर्फे चंद्रकांत डांगे व प्रतिभा डांगे यांचा सत्कार करतांना
करीम सालार,विनोद देशमुख,फारूक शेख,गनी मेमन,सरिता माली, आदी दिसत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.