अमेरिकेचा इराणवर पुन्हा हवाई हल्ला ; ६ ठार

0

बगदादः अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये शनिवारी पुन्हा एक हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी याच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला होता.

आज केलेल्या हवाई हल्ल्यात ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी चा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. बगदादमध्ये या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक असल्याचं म्हटलं जात आहे. या गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नाही, असं इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं हा हल्ला हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून केला होता. इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.