बोदवड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराचा समारोप

0

बोदवड – भारताला महासत्ता बनवायचं असेल तर स्वयंसेवकांनी जनसेवेतून राष्ट्रसेवा करावी असे मत  समारोप समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. मिठूलालजी अग्रवाल यांनी व्यक्त केले.तसेच संस्थेचे सचिव श्री. विकासभाऊ कोटेचा यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

दि.१ जानेवारी २०२० रोजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील रा.से.यो.एककच्या विशेष हिवाळी शिबीराचा समारोप समारंभ दत्तक ग्राम हरणखेड येथे  संपन्न झाला.शिबिरामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य  प्राध्यापक अरविंद चौधरी व  कार्यक्रम अधिकारी डॉ. चेतनकुमार शर्मा यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टाय, बेल्ट व शूज यांचा वाटप करण्यात आला.शिबिरामध्ये  उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून  अजमल व तेजस तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून स्वप्नाली व प्रियंका यांची निवड करण्यात आली.प्रसंगी संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. डी.एस.पाटील तसेच हरणखेड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिरांमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांचा अहवाल रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी श्रीमती कंचन दमाडे यांनी मांडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्वप्नाली सरताळे तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. चेतनकुमार शर्मा यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहायक कार्यक्रम अधिकारी नितेश सावदेकर,संजय भाते व शिबिरातील सर्व स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले व गावातील नागरिक रूपेशभाऊ गांधी,नरहरी वराडे(उपसरपंच),विवेक जोशी , श्रीकृष्णा रोकडे,आस्तिक अहिर व सर्व गावकरी मंडळी  यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.