अंतयात्रेला जाणार्‍या दोघांना भरधाव कारने उडविले

0

खोटेनगर स्टॉपवरील घटना; महिला गंभीर जखमी

जळगाव दि. 17-
पिंप्राळ्याला नातेवाईकाच्या अंतयात्रेला जाणार्‍या दोघांच्या दुचाकीला कारने उडविल्याची घटना खोटेनगर स्टॉपवर दुपारी 4 वा. महामार्गावर घडली. या घटनेत महिलेच्या डोक्याला जबर मुका मार लागला असून बेशुद्धावस्थेत आहे. तर मोटारसायकल चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
दहिगाव येथील रहिवासी नारायण नयनसिंग पाटील (50) हे आपली मोटारसायकल एम. एच. 19–3994 ने नातेवाईक सुनंदाबाई विजयसिंग पाटील (55) रा. कल्याणहोळ, धरणगाव यांच्यासह कल्याणहोळ येथे नारळगोट्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे त्यांना दुपारी पिंप्राळ्यात नातेवाईकाचे निधन झाल्याची बातमी समजली. तेथे जाण्यासाठी हे दोघे दुचाकीवर परत येत असताना रविवारी दुपारी 4 वा. खोटेनगर स्टॉपवर समोरुन येणारी स्विफ्ट कार एम. एच. 02-एएल 353 या कारचालकाने नारायण पाटील यांनी गाडी वळविण्यासाठी इंडिगेटर्स ऑन असताना सुद्धा भरधाव गाडी आणून समोरासमोर धडक दिली. या अपघातात सुनंदाबाई यांच्या डोक्याला जबर मुका मार लागला असून त्या बेशुद्धावस्थेत होत्या. तर नारायण पाटील यांना पायाला, पाठीला मुका मार लागला. कारचालकाने दोघांना वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आणून सोडून नंतर पोबारा केल्याचे समजते.
डॉक्टर नसल्याने इतरत्र हलविले
दुपारी 5 वा. वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता. प्राथमिक उपचारानंतर संबंधित जबाबदार डॉक्टर उपस्थित नसल्याने वेळीच उपचार होवू न शकल्याने खाजगी दवाखान्यात सुनंदाबाई यांना हलविल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.