अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एरंडोल येथे घेतले पेप्सीचे नमुने

0

एरंडोल –
खादिजा कश्यप वय 4 वर्षे व सहेर अंजुम शे. इरफान यांनी पेप्सी खाल्ल्याने विष बाधा झाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन खळबळून जागे झाले. अन्न सुरक्षा अधिकारी साळुंखे व नमुना सहाय्यक सोनवणे यांनी शनिवारी एरंडोल येथे कागदीपुरा भागात भेट दादा चुका वगैरे सर्व फोन घेतला का देऊन मृत चिमूरड्यांच्या मामांचा लेखी जवाब घेतला. व पेप्सीचे नमुने घेतले. तसेच याबाबत एरंडोल पो. स्टे. ला पत्र दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
एरंडोल येथे पेप्सीचे अनाधिकृत उत्पादक 5 ते 7 जण असल्याचे बोलले जाते. तसेच अमळनेर, जळगाव, म्हसावद, शेंदुर्णी व इतर भागातून पेप्सी विक्रेते येथे विक्रेत्यांना पेप्सीचा पुरवठा करतात. पेप्सीतून विषबाधा झाल्यामुळे एका निरागस चिमुकलीचा नहक बळी गेला.
दरम्यान न.पा. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी सुजाण नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकारी लोकसभा निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे शेख कुटुंबाला कोणताही अधिकारी भेटण्यास गेले नाही. या संवेदनाशून्य कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.