गिरडगाव ते यावल रस्त्याचे वाजले की बारा; संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर गिरडगाव ते यावल या रस्त्यावर मोठमोठे जिवघेणे खड्डे पडले आहे. मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे बंद असून आंधळे पणाचे सोंग घेत आहे. तसेच नावरा गावालगत भोनकनदीवर असलेल्या पुलावर जागो जागी देखील मोठ मोठी जिवघेणी खड्डे पडलेली दिसुन येत आहे. पुलामधील लोखंडी गजही वर आलेले आहे.  त्या खड्यांना लोखंडी गजाना चुकवत असतांना अनेक वेळा छोटे मोठे अपघात ही होतांना दिसुन येत आहेत.

अंकलेश्वर महामार्गावर पडलेल्या या खड्यांमुळे वाहन चालकास जिव मुठ्ठीत धरुन डोळ्यात तेल घालुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. या जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहन धारक, प्रवासी  नागरीकांमध्ये संताप व्यक्त होतांना दिसुन येत आहे. अंकलेश्वर महामार्गावर जड अवजड लहान मोठे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ चालु असते,  तर बांधकाम विभागाचे डोळे बंद असुन आंधळेपणाचे सोंग  घेतले आहेत की काय? का संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या वाहनधारकाचा जीव  जाण्याची वाट पाहत आहे काय? असा  संतप्त प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थ करीत आहे.

नुकतेच दहा महिन्यांपूर्वी  या रस्त्यावरील डागडुगी करण्यात आली होती. डांबरीकरणही झाले होते, मात्र काही दिवसातच या रस्त्याची पुर्णपणे चाळणी झाल्याने रस्त्याचे काम नित्कृष्ठ झाल्याने सदर संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई होईल काय?  असे सुज्ञ नागरीकां डुन बोलले जात आहे.  याच पुलाजवळ दोन्ही बाजुंनी वळणाचा रस्ता असल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहन समोरा समोर आल्यावर वाहन धारकास आपले वाहन खड्यामंध्ये टाकावे लागते.  त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.  खड्डा  चुकवायचा तरी कोणता अशातच समोरुन वाहन येतांना  दिसल्यावर खड्डे चुकवण्याच्या घाई गडबडीत अपघात घडुन येतात.

यासाठी बांधकाम विभागाने व लोकप्रतिनीधीने तातडीने लक्ष घालुन ही समस्या सोडवण्याची गरज आहे, असे ग्रामस्थ व वाहन धारकांनमध्ये बोलले जात आहे.  या रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास गिरडगाव, वाघोदा, चुंचाळे या तिन्ही गावातील नागरिक खंड्यात बसून  तिव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.