जि.प. समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली नोटीसांची होळी

0

जळगाव : अंगवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करता नोटीस बजावून दबाव आणल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर नोटीसांची होळी करून निषेध व्यक्त केला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि.४ डिसेंबर २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा. वि.) जिल्हा परिषद जळगाव यांच्या सूचनेनुसार आप आपल्या प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना कामावर हजर व्हावे अन्यथा सेवेतून कार्यमुक्त केले जाईल, अशा आशयाच्या नोटिसा देवून अंगणवाडी कर्मचारी यांचेवर मानसिक दबाव आणला असून संप चिघळविण्याचा प्रयत्न केला आहे.

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या न सोडवता त्यांच्यावर कार्यवाही सुरु केली. म्हणून अंगणवाडी कर्मचारी प्रचंड नाराज आहेत. सेवेतून कमी करण्याच्या दिलेल्या बेकायदेशीरनोटीसींची आज संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद जळगांव येथे सामूहिक होळी करून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथून जि.प. पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

सदर आंदोलनात जिल्ह्यांतील सुमारे तीन हजार पेक्षा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका उपस्थित असल्याचे रामकृष्ण पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, सुलोचना पाटील, आशा जाधव, पुष्पा परदेशी, रेखा नेरकर, सरला पाटील, शकुंतला चौधरी, सुनंदा नेरकर, कल्पना जोशी, उज्वला पाटील, निता सुरवाडे, प्रतिभा पाटील, रंजना मोरे, मनिषा कोठवदे आदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.