मुंबई : महाराष्ट्रात मान्सून आगमनाच्या घोषणेनंतरही पावसाच्या सरी बरसण्यास विलंब होत आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. परंतु, आता राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यानुसार 19 ते 21 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून 20 व 21 जून या कालावधीत जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आवाहन कृषी अधिकारी करत आहेत. खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.