नात्याला काळिमा ! दारूसाठी बापाने 3 वर्षाच्या मुलाला विकले

0

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यवतमाळच्या आर्णीमधून बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.  एका पित्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला दारूसाठी विकले. पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. याशिवाय आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दारूसाठी विकले

मिळालेल्या माहितीनुसार,  आर्णी तालुक्यातील एका तीन वर्षाच्या मुलाला त्याच्याच वडिलांनी तेलंगणातील आदिलाबाद येथे दारूसाठी विकले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटकही केली आहे. पती-पत्नीचे पटत नव्हते, असे सांगितले जात आहे. यामुळे दोघेही गेल्या महिन्यापासून वेगळे राहत होते. पीडित मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. दरम्यान, पित्याने आपल्या मुलाला दारूसाठी विकले. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडिलांसह कोपरा गावातील अन्य एका व्यक्तीला अटक केली.

गुन्हा दाखल

मुलाचे वडील श्रावण दादाराव देवकर (वय ३२), चंद्रभान देवकर (६५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर कैलास लक्ष्मण गायकवाड व बाल्या गोडांबे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.  पुष्पा देवकर (27) ही पती श्रावण याच्यापासून गेल्या एक महिन्यापासून वेगळी राहत होती. त्यांना जय देवकर हा तीन वर्षांचा मुलगा असून तो वडील श्रावण देवकर यांच्यासोबत राहत होता. आई पुष्पा यांना पती श्रावण आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा जय याला तेलंगणातील आदिलाबाद येथे विकल्याची माहिती मिळाली. यानंतर पुष्पा देवकर यांनी तत्काळ आर्णी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी श्रावण देवकर व अन्य तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.