Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शेतमजुराचा सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू
    जळगाव जिल्हा

    शेतमजुराचा सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 22, 2022Updated:December 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील यावल चोपडा मार्गावरील नावरे गाव फाटयाजवळच्या शेतात विषारी सापाचा दंश झाल्याने तरूण शेतमजुराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.

    सुनील भिमसिंग पाटील (वय ४२, रा. नावरे ता. यावल) हा तरूण शेतमजुरीचं काम करतो. सुनील पाटील हे दि. २१ डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास पन्नालाल चम्यालाल जैन यांच्या वढोदे शिवारातील शेतात गुरांना कडबा चारा आणण्यासाठी गेला होते. मयत पाटील हे गावापासुन एक किलोमीटर लांब असलेल्या नावरे फाट्याजवळच्या शेतात गेले होते. ते उशीरापर्यंत घरी न आल्याने मयताची बहीण त्यास शेतात पाहण्यासाठी गेली असता शेताच्या बांधावर सुनिल पाटील हा मृत अवस्थेत आढळ्रन आला.

    सुनील पाटील यांना विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा दुदैवी मृत्यु झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता. यावल ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असुन त्यास डाव्या हाताला विषारी सापाने दंश केल्याने मरण पावल्याचे शवविच्छेदनातुन निष्पन्न झाले. याबाबत हिंमत बाबुराव पाटील (वय ४०, रा. नावरे) यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे व पोलीस हॅड कॉस्टटेबल संजय देवरे पोलीस करीत आहे.

    Farm laborer dies of snakebite snakebite Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif