रिक्षा घेण्यासाठी 2 लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील मालोद येथील माहेरवासीन असलेल्या विवाहीतेचा सासरच्या मंडळीकडून आर्थिक लोभापोटी मानसिक व शारीरिक छळ पोलीस ठाण्यात पतीसह तिन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्या विक्की सोनवणे (वय २१ वर्ष रा.मालोद तालुका. यावल) या विवाहितेस पती विक्की महेंद्र सोनवणे, नंणद मोनिका गोविंद मेढे व आज सासु अनुसया लक्ष्मण सोनवणे सर्व रा.कानळदा ता.जि.जळगाव यांनी मिळून सासरची मंडळीने वेळोवेळी छळ केला.  पती विक्की सोनवणे व नंणद मोनिका मेढे यांनी मिळुन विवाहितेस माहेरून रिक्षा खरेदीसाठी २ लाख रुपये आणावे यासाठी तकादा लावत मागणी केली व विवाहीतेने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला सासरच्या मंडळीने शिविगाळ करीत मानसिक व मारहाण करीत शारीरिक त्रास दिला.

याबाबत विवाहित महिला हिने यावल पोलीस ठाण्यात पतीसह नंणद व आजल सासु या तिघा संशयीतांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशान्वये सहाय्यक फौजदार असलम खान हे करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.