यावल शहरात अदृश्य आजाराने १२०० डुकरांचा मृत्यू, लाखो रुपयांचे नुकसान

नागरीकांनी दक्षता घ्यावी यावल नगरपरिषदेचे आवाहन

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल नगरपरिषदेच्या हद्दीत अदृश्य आजाराने कहर केल्याने सुमारे १२०० डूकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती नगरपरिषदचे स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांनी दै लोकशाहीला दिली.

नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे
यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासुन विविध ठिकाणी अदृश्य अशा आजाराने मोठ्याप्रमाणावर डुकरांचा मृत्यू होत आहे. मरण पावलेल्या डुकरांची दुर्गंधी ही अत्यंत वेगाने परिसरात पसरत असुन नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान यासंदर्भात यावल नगर परिषदचे आरोग्य अभियंता सत्यम पाटील याची दक्षता घेत पशुसंवर्धन अधिकारी यांना याची जाणीव एक महीना आदीच करून दिली. असल्याचे पाटील यांनी सांगीतले.

या अदृश्य आजारामुळे दिवसाला ३० जनावरांचा मृत्यू होत आहे. तसेच त्यांची दुर्गंधी पसरू नये म्हणून मेलेल्या जनावरांचे नगरपरिषदेमार्फत लागलीस विल्हेवाट करण्यात येत आहे. या आजारामुळे आतापर्यंत सुमारे १२०० च्या वर जनावरांचा मृत्यु झाला असल्याने उपाययोजना म्हणुन नगर परिषदच्या माध्यमातून शेकडो जनावरे स्थलांतरीत करून इतर ठीकाणी पाठविण्यात आल्याचे आरोग्य व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांनी सांगीतले. दरम्यान अदृश्य आजाराने होत असलेल्या मृत्यूमुळे पशु पालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.