पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथे शेतकरी संघाच्या निवडणूकीत आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला १५ पैकी १५ जागांवर विजय मिळविला होता.
यानंतर या शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदी विजय सुदाम पाटील तर उपाध्यक्षपदी गंगुबाई प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी या नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकी संघाचे मा.अध्यक्ष जिजाबराव पाटील, गोविंद पाटील, जि.प.मा. कृषि सभापती डॉ. दिनकर पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बाजार समितीचे संचालक प्रा. बी. एन. पाटीलर, भैय्यासाहेब पाटील, एरंडोल मा. तालुकाप्रमुख बबलुपाटील, देवगांव सरपंच समीर पाटील, शेतकी संघाचे संचालक सुधाकर पाटील, डॉ. निलेश पाटील, भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील, डॉ. जितेंद्र गिरासे, दिपक पाटील, राहुल चव्हाण, प्रकाश पाटील, मधुमती पाटील, सचिन पाटील, भिडुभाऊ जाधव, उंदिरखेडे सरपंच गणेश पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष सखाराम चौधरी, नाना पाटील, संचालक भिकन महाजन, दास पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील प्रकाश पाटील, मा, नगरसेवक अमोल पाटील, मंगरूळ येथील बंटी पाटील, विलास वाघ, राजु पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, टिटवी येथील उदय पाटील, बंटी पाटील, ज्ञानेश्वर बारी, विचखेडा येथील विजय निकम, आडगांव पोलीस पाटील मनोहर मोरे, अमोल मराठे, योगेश चौधरी, पिंटु बारी, पंकज मराठे, यांच्या सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.