कौटुंबिक वादामुळे विवाहितेने सोडले घर, यावल पोलीसात हरविल्याची नोंद

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मनवेल (ता. यावल) येथील विवाहित तरूणी घर सोडून निघुन गेली. याबाबब यावल पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहीत तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहीती अशी की, शारदा सचिन बागुल ही विवाहित महिला १२ डिसेंबर रोजी आपल्या पती सचिन संजय बागुल यांच्याशी झालेल्या कौटुंबीक वादामुळे गावातच राहणाऱ्या आजी सासु कमलाबाई वसंत बागुल यांचे कडे काही दिवस राहण्यासाठी गेली असता, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सूमारास आपल्या राहत्या घराच्या मागे शौचालयला जावुन घरात परतली असता त्यांची नात सून शारदा घरातुन निघुन गेल्याचे आढळून आले. या संदर्भात कमलाबाई वसंत बागुल यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने विवाहीत तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी हे करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.