व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन फिचर येणार, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात दोन अब्जांहून जास्त युजर्स आहे. आपल्या युजर्सला हे अ‍ॅप वापरण्यासाठी जास्तीतजास्त चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी नेहमी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपने चॅटिंगमध्ये चक्क एक्सेल शीटमध्ये असणारं फीचर दिलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करतांना तुम्हाला बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीला काही पॉइंटर्स किंवा यादी पाठवावी लागते. अशा वेळी तुम्हाला प्रेत्येक पॉइंटच्या समोर आकडे लिहावे लागतात. मात्र, या नव्या फीचरमुळे तुमचा हा त्रास वाचणार आहे.

कसं काम करतं फिचर ?
मेसेजमध्ये लिस्ट करतांना तुम्हाला केवळ अहिल्या पॉईंटच्या समोर १ हा अंक लिहावा लागणार आहे. त्यानंतर पुढे काही शब्द जेव्हा तुम्ही एंटर क्लिक कराल, तेव्हा खाली आपोआप २ हा अंक लिहिलेला येईल. अशाप्रकारे ३, ४, ५ असे अंक खाली येत जातील. विशेष म्हणजे, केवळ नंबरच नाही तर, पॉइंटर्ससाठी तुम्ही बुलेट्सचा वापरही करू शकता. एकूणच, एक्सेल शीटमध्ये ज्याप्रमाणे यादी तयार करता येते, तसंच आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये करता येईल.

इतर फीचर्स
WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे फीचर मिळणार आहे. यासोबच टेक्स्ट अरेंज करण्यासाठी ब्लॉक्स, बुलेट लिस्ट, नंबर लिस्ट, कोट ब्लॉक असे फीचर मिळणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.