देऊळगाव राजा तहसीलदार पदी डोंगरजाल यांनी स्वीकारला पदभार

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा प्रथम टप्पा हा अधिकारी यांच्या बदल्यांचा पार करतांना शासनाकडून तहसीलदार यांच्या फेरबदलबाबत केलेल्या निर्णयात देऊळगाव राजा तहसीलदार म्हणून वैशाली डोंगरजाल यांनी रात्री उशिरा तहसिलला येऊन आपला पदभार स्वीकारला डोंगरजाल या छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय कृषिक विभागातून आलेल्या आहे. (दि.५) रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान डोंगरजाल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर शाम धनमने हे अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे रुजू झाले आहे. जाता-जाता नुकताच पदभार घेतलेल्या डोंगरजाल यांचा धनमने यांनी सत्कार करून अकोला येथे रवाना झाले.

देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस,टाकरखेड भागीले, देऊळगाव मही, खल्ल्याळ गव्हाण परिसरातील खडकपूर्णा धरणातून होणारा अवैधरित्या बोटीद्वारे उपसा यावर अंकुश घालणे मोठे आव्हान राहणार आहे. बदली होऊन गेलेले तहसीलदार शाम धनमने यांना अखेर अनेक उपाययोजना करूनही भरपूर त्रास झाला. तर कोतवाल, सरपंच, हेच रेती माफिया बनलेले असून स्वतःच्या घरापासून रेतीमाफिया यांच्या मुसक्या आवळणे सुरू करावे लागेल. एवढे मात्र नक्की

Leave A Reply

Your email address will not be published.