WhatsApp ने तब्बल 22 लाखांपेक्षा जास्त अकाउंट केले बंद..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इन्स्टंट मेसेजिंग अँप व्हॉट्सअँप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी कोणत्याही नवीन फीचर्समुळे किंवा नियमामुळे नाही तर ते एका निर्णयामुळे. व्हॉट्सअँपने 22 लाखांहून अधिक व्हॉट्सअँप अकाउंट्सवर बंदी घातली आहे. कंपनीच्या मासिक रिपोर्टमुळे याचा खुलासा करण्यात आला आहे. ज्या व्हॉट्सअँप अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे त्यांनी नियम मोडल्याचे सांगण्यात आलं आहे.

युजर्सच्या तक्रारींवरूनही कारवाई :

व्हॉट्सअँपने आपल्या युजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजर्सवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअँपच्या यूजर सेफ्टी रिपोर्टमध्ये एकूण 22 लाख 9 हजार अकाउंट्स बॅन केल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअँपने म्हटले आहे की, या युजर्सच्या सुरक्षा रिपोर्टमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आणि युजर्संनी केलेल्या कृती तसेच प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी व्हाट्सअँपने केलेल्या कारवाईचा समावेश आहे.

व्हॉट्सअँपने सरकारला सांगितले की, सप्टेंबरमध्ये त्यांना अकाउंट सपोर्ट, बॅन अपील, इतर सपोर्ट व प्रॉडक्ट सपोर्ट आणि सेफ्टी कॅटॅगरी, या श्रेणींमध्ये युजर्सने व्युत्पन्न केलेल्या 560 तक्रार रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.

अकाउंट सपोर्ट (121), बॅन अपील (309),इतर सपोर्ट व प्रॉडक्ट सपोर्ट (प्रत्येकी 49) आणि सेफ्टी कॅटॅगरी (32).कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, WhatsApp हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवा प्रदाता आणि मेसेजिंगचा दुरुपयोग रोखण्यासाठी अग्रगण्य अँप आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इतर टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. डेटा शास्त्रज्ञ आणि तज्ञांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे.

तुमचे खाते सुरक्षित कसं ठेवाल ?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, धमकावणारे, त्रास देणारे आणि द्वेष करणारे भाषण किंवा वांशिक किंवा वांशिक भेदभाव शेअर करत असेल किंवा अन्यथा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अनुचित प्रथेला उत्तेजन देत असेल, तर त्याच अकाउंट बॅन करण्यात येत आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने व्हॉट्सअँपच्या टर्म्स एंड कंडीशनचे उल्लंघन केले तरी त्याचे अकाउंट बंद केले जाते. म्हणून, कोणाला त्रास पोहचू शकेल अशी सामग्री शेअर करू नका, त्याच प्रकारे तुम्ही तुमचे खाते सुरक्षित ठेवू शकाल.

Leave A Reply

Your email address will not be published.