गायब झालेली थंडी पुन्हा येणार !

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. जास्त करून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. सोबतच पुढील दोन दिवसात गेलेल्या थंडीची लाट पुन्हा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे. किमान पॅरा २ ते ४ अंशांनी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशाच्या उत्तर भागात मागच्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. याच कारणामुळे पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज वेधशाळेकाढून वर्तविण्यात आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात ऊनही वाढल्याने थंडी हि गायब झाली होती. यंदाच्या मोसमात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. परिणाम स्वरुप पहाटे दिवसभर थंडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाण बोचरी थंडी जाणवत आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट अनिभवायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.