कृषी विभागामार्फत भरारी पथके; कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी सुरू

0

वाकोद, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सन २०२२ च्या खरीप हंगामाला सुरुवात होत असून शेतकरी वर्गाची फसवणूक न होता खरीप हंगामासाठी लागणारे अधिकृत कंपण्याचे दर्जेदार बि-बियाणे, रासायनिक खते, तसेच फवारणी साठी लागणारे किटकनाशके व औषधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत जामनेर तालुक्यात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून तालुक्यातील विविध कृषी निविष्ठा विक्रेत्यांची पथकातर्फे तपासणी सुरू आहे

१ जून नंतरच बियाणे विक्री ; अन्यथा कारवाई

सन २०२२च्या खरीप हंगामा करीता जामनेर तालुक्यासाठी २ लाख १० हजार कापूस बियाणे पाकिटे आवश्यक असून, आजपर्यंत १ लाख ३० हजार कापूस बियाणे पाकिटे विक्री केंद्रावर उपलब्ध झालेले आहे व यापुढे टप्प्याटप्प्याने कंपनीकडून विक्रेत्यांना वितरित करण्यात येणार आहे, मात्र बोंड अळी व गुलाबी बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता व तो रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री १ जुन नंतर करण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

जेणेकरून नियोजनानुसार हंगामी लागवड करून शेतकरी वर्गाला फ़ायदेशीर राहील व आळी वर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी शासनाने नियोजित केलेल्या कार्यक्रमानुसार शेतकरी वर्गाला लागवड करता येईल. याबाबत कृषी विभागाकडून परिपत्र काढण्यात आले असून जे विक्रेते परीपत्रकाचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकारी यांच्या कडून देण्यात आली आहे.

शेतकरी बांधवानी पेरणीची घाई करू नये

गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री १ जुन नंतर करण्याबाबत परिपत्रक काढले आहे, तसेच शेतकऱ्यांनी कापुस बियाणे लागवडीसाठी घाई करू नये. तसेच १ जून नंतर अधिकृत बियाणे केंद्रावर पक्की पावती (बिल) घेऊन बियाणे खरेदी करावे तसेच HTBT कापूस बियाणे विक्रीस केंद्र सरकारची परवानगी नसल्याने शेतकऱ्यांनी HTBT, BG III, 4 G बियाणे खरेदी करू नये, यात त्यांची फसवणूक होऊ शकते असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजू ढेपले, मंडळ कृषी अधिकारी निता घार्गे, चास्कर मॅडम कृषी केंद्र तपासणीसाठी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.