‘विराट कोहली’ ठरला गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ‘मॅन ऑफ दि टूर्नामेंट, ठरलेल्या विराट कोहलीला त्याचे चाहते ‘किंग कोहली’ म्हणून ओळखतात. क्रिकेटच्या दुनियेत जसे कोहलीचा बोलबाला आहे. तसच इंटरनेटवरही कोहलीचा बोलबाला आहे. या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर म्हणून विराट कोहलीचं नाव समोर आलं आहे.

‘रन मशीन’, अशा नावाने ओळख असणारा कोहली सध्या क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर आहे. यात तीळ मात्र शंका नाही. गुगल सर्चच्या अहवालामुळे तर हे स्पष्टच झालं आहे. इंस्टाग्रामवर देखील कोहलीचा सर्वाधिक फॉलोवर्स असणारा आशियाई व्यक्ती आहे. त्याचे तब्बल २५९ मिलियन फॉलोवर्स आहेत.

आशियामध्ये कोहली टॉपवर
यासोबतच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला आशियाई व्यक्ती देखील कोहलीचा आहे. विशेष म्हणजे
प्रसिद्ध के-पॉप सिंगर व्ही (BTS V) आणि जुंग कुक (Jungkook) यांनाही विराट कोहलीने मागे टाकलं आहे. हे सिंगर्स BTS या साऊथ कोरियन

आशियामध्येही कोहलीच टॉप
यासोबतच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला आशियाई व्यक्ती देखील विराट कोहलीच ठरला आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध के-पॉप सिंगर व्ही (BTS V) आणि जुंग कुक (Jungkook) यांनाही विराट कोहलीने मागे टाकलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.