लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीय. त्यातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने चक्क एकाच मांडवात ४ मुलींशी एकसाथ लग्न करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाहीये.
https://x.com/darshanvpathak/status/1732278991107522745?s=20
या व्हिडिओमध्ये एक वर आपल्या चार नववधूंसोबत मंडपात फेऱ्या मारत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
लोकांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘विश्वास बसत नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘ नशीबवान आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा व्हिडिओ फेक आहे.’