Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ब्रेकिंग»शिव महापुराण कथास्थळी चोरी करणाऱ्या महिला गँगचा पर्दाफाश
    ब्रेकिंग

    शिव महापुराण कथास्थळी चोरी करणाऱ्या महिला गँगचा पर्दाफाश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : तालुक्यातील वडनगरी फाटा येथे सुरु असलेल्या श्री. शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या गळ्यातून मंगलपोत चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील २७ संशयित महिलांच्या टोळीच्या एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीने मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील मालेगाव व धुळे याठिकाणी पार पडलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये हात सफाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध तब्बल २१ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    जळगाव तालुक्यातीलव डनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ श्री. शिवमहापुराण कथेला मंगळवारपासून सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक दाखल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोनपोत लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने संशयितरित्या फिरणाऱ्या तब्बल २७ महिलांना ताब्यात घेतले. यामध्ये अल्पवयीन मुलींचा देखील सहभाग होता. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    टोळीवर तब्बल २१ गुन्हे दाखल एलसीबीने पकडलेली

    टोळी ही मध्यप्रदेशातील घडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, घडेली चारभुजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील आहे. या टोळीतील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असून १३ संशयित एका गावातील तर ८ संशयित महिला एका गावातील अन्य इतर गावातील आहे. या टोळीतील महिलांविरु चोरी, जबरी चोरी सारखे त्तब्बल २१ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

     

    प्रसिद्ध कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या श्री. शिवमहापुराण कथा आयोजीत केली जाते. त्याठिकाणी ही टोळी गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी लांबवित असल्याची उघड झाले आहे

    टोळीने मालेगाव, धुळे याठिकाणी पार पडलेल्या कथेमध्ये देखील त्यांनी हातसफाई केली आहे. याठिकाणाहून त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. एलसीबीने पकडलेल्या टोळीकडून सुमारे ४ ते ५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.

     

    ही टोळी कथेच्या पहिल्याच दिवशी भाविक म्हणून कथास्थळी जातात. मुक्कामी असलेली ही टोळीतील महिला आपल्या हातील ब्लेड सारख्या धारदार शस्त्राने महिलांचे लक्ष विचलीत करुन त्यांच्या गळयातील सोन्याची पोत लांबवितात. चोरी करतांना पकडल्या गेल्यास त्या
    देखील करतात. यावेळी सोबत असलेले साथीदार मध्यस्ती करीत त्यांचा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत आपल्या साथीदाराला पळून जाण्यास मदत देखील करत असल्याचे उघड झाले आहे.

    गुन्ह्यांसह संशयित आरोपी वाढण्याची शक्यता

    पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या टोळीत अल्पवयीन मुलीसह २६ महिलांचा समावेश आहे. यातील बहुतांश महिला या २० ते ४० वयोगटातील असून त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे असल्याचे भासवितात. त्यांना अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत ही माहिती उघड

    आहे. कथास्थळी असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात असून त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांसह आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

    चार दिवसांची पोलीस कोठडी

    दरोडा टाकणाऱ्या परराज्यातील महिलांच्या टोळीविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या संशयित महिलांना बुधवारी न्यायाधीश व्ही. एम. देशमुख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon shivmahapuran
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif