जळगावात महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- मुलाला मारहाण का केली याचा जाब विचारणाऱ्या एका महिलेला चपटा बुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी चौघांवर रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या मुलाला मारहाण केल्यानंतर तिने आरोपी प्रवीण शिरसाळे त्याची आई आणि दोन अनोळखी इस्मानी पीडित महिलेस तू वेश्या असून असे बोलून तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिला धमकी दिली. हा प्रकार 13 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल अजित पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.