काँग्रेसला धक्का ! बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंगने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 2019 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

https://x.com/ANI/status/1775457358849712369?s=20

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विजेंदरसिंगयांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या आगमनाने पक्ष अधिक बळकट होऊन ध्येयाकडे वाटचाल करेल. बॉक्सिंगमध्ये विजेंदरला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी विजेंदर सिंगने राजकारणात प्रवेश केला होता. दक्षिण दिल्लीतून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या रमेश बिधूडी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. बिधूडी यांना ६ लाख ८७ हजारांहून अधिक मते मिळाली. आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांना 3 लाख 19 हजारांहून अधिक तर विजेंदरला 1 लाख 64 हजारांहून अधिक मते मिळाली.

विजेंदर हा मूळचा हरयाणा जिल्ह्यातील भिवानी चा रहिवासी आहे. ते जाट समाजातून येतात. अशा परिस्थितीत पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या जागा भाजपसाठी अनुकूल ठरू शकतात. विजेंदरने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. विजेंदरबाबत असे दिसून आले आहे की, तो सरकारविरोधात आवाज उठवत आहे. ते प्रत्येक मुद्दा मोकळेपणाने मांडतात. विजेंदर सिंगच्या माध्यमातून भाजप हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात आपली ताकद मजबूत करणार असल्याचे मानले जात आहे. विजेंदरने 2020 मध्ये ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.