विजय देवरकोंडाने अखेर साखरपुड्याच्या बातम्यांवर सोडले मौन !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघेही चर्चेत आहे. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे हे दोघं लवकरच साखरपुडा करणार आहे. मात्र या बातमीवर विजय किंवा रश्मिका या दोघांपैकी कोणीच दुजोरा दिलेला नाही. सोशल मीडियावर त्यांचे चाहते या बातमीने खुश झाले होते. साखरपुड्याच्या या चर्चांवर आता अखेर विजयने मौन सोडला आहे.

विजय देवरकोंडाने ‘लाइफस्टाइल आशियाला’ दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि रश्मिकाच्या साखरपुड्यावर बोलला आहे. या अफवा असल्याचं त्यानं म्हटलं आहे “मी फेब्रुवारी साखरपुडा करणार नाही. अशा अफवा मी दरवर्षी येतो मीडिया दर दोन महिन्यांनी माझं लग्न करू इच्छिते, ते फक्त माझ्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे”. असं विजय देवरकोंडा यांनी स्पष्ट केला आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम सध्या तरी लागलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.