२६ वर्षीय महिलेने चिमुलक्यासह विहिरीत उडी घेत संपवल जीवन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

२६ वर्षीय विवाहितेने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची सोमवारी दि.६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा या गावी घडली आहे. या घटनेनंतर या दोघांना बाहेर काढतांना एका तरुणाचा देखील विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये मृत मायलेकरांचे नाव शीतल गणेश थुट्टे (वय २६), देवांशी गणेश थुट्टे(२१ महिने) अशी असून मृत युवकाचे नाव सिद्धार्थ निंबाजी शिरसाट असे आहे.

सावितर माहिती अशी की, भरोसा येथील गणेश थुट्टे (वय ३०) यांची पत्नी शीतल ही सोमवारी शेतीकामासाठी स्वतःच्या शेतात गेली होती. गणेशने शीतलला लवकर घरी येण्यासाठी फोन केला. त्यामुळे ती तिच्या २१ महिने वयाच्या मुलाला, देवांशाला घेऊन सायंकाळी ४ च्या सुमारास घराकडे निघाली. परंतु संध्यकाळालपर्यंत शीतल घरी पोहोचली नाही, म्हणून शीतल व देवांशचा सर्वत्र शोध सुरु झाला.

दिनकर जाधव यांच्या मालकीच्या रस्त्यात असलेल्या शेतातील विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात देवांशचा मृतदेह तरंगताना दिसून आला. शीतलने देवंशसह रात्री गावातील दिनकर जाधव यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. विहिरीजवळ गावकरी जमा झाले असता सिद्धार्थ शिरसाट या तरुणाने उत्साहाच्या भारत दोघं मृतदेह काढण्यास उडी मारली असता, रात्रीचा अंधांवर व विहिरीच्या गाळामुळे त्याचाही बुडून मृत्यू झाला. विहिरीच्या काठावर असलेल्या लोकांनी विहिरीत लगेच दोर टाकला. तो दोर हाती लागल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अंढेरा पोलिसांना या घटनेची माहिती माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढलेत. मृतदेह तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.